Bharli vangi - maharashtrian recipes | Indian recipes


Bharli vangi बघून खूप जणांच्या तोंडाला पाणी सुटत. साधी वांग्याची भाजी खूप लोकांना आवडत नाही. म्हणून मी आज तुम्हाला झणझणीत Bharli vangi maharashtrian recipes कशी बनवायची ते सांगणार आहे. 

Bharli vangi - maharashtrian recipes | Indian recipes  

Bharli vangi - maharashtrian recipes | Indian recipes
Bharli vangi - maharashtrian recipes | Indian recipes

Bharli vangi बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

तीळ - १ चमचा 
धने - १ चमचा 
खसखस - १ चमचा 
बडीशेप - १ चमचा 
शेंगदाणे - १/४ कप 
किसलेले सुके खोबरे - १/४ कप 
लाल तिखट - २ चमचे 
हळद - १/२ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - १/२ कप 
छोटी वांगी  - ६ ते ७ 
तेल - ३ चमचे 
मोहरी - १/२ चमचा 

Bharli vangi बनवण्याची कृती :

Bharli vangi बनवण्यासाठी, प्रथम गॅस वर मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यामध्ये तीळ टाका आणि चांगली भाजून घ्या. त्याच प्रमाणे धने, खसखस, बडीशेप,शेंगदाणे आणि किसलेले सुके खोबरे चांगले भाजून घ्यावे. 

नंतर एक मिक्सरचे भांडे घ्या. त्यात सर्व भाजलेले साहित्य टाका. सोबतच लाल तिखट,गरम मसाला ,हळद आणि मीठ टाकून सर्व बारीक करून घ्या. त्या मिश्रणात कोथिंबीर कापून टाका. 

एका बाजूला एका प्लेट मध्ये सर्व वांगी धुवून घ्या. एका वांग्याचे ४ भाग करा.त्या वांग्यांना पूर्ण कापून टाकू नका. अश्या प्रकारे सर्व वांगी कापून घ्या. नंतर त्या कापलेल्या वांग्यामध्ये ते मिश्रण भरा.

एका बाजूला कढई मध्ये तेल टाका. त्यात मोहरी टाका. ती मोहरी थोडी ताडताड झाली की त्यात Bharli vangi टाका. नंतर त्यात १/२ कप पाणी टाकून त्याला झाकून ठेवा. मध्ये मध्ये त्यांना हलवा.
  
२० ते २५ मिनिटानंतर झाकण काढून वांगी शिजली कि नाही एकदा बघा. वांगी चांगली शिजल्यावर गॅस बंद करा. 

अशी ही झणझणीत Bharli vangi गरम गरम सर्व्ह करा. ही Bharli vangi आवडल्यास कंमेंट करून नक्की सांगा.  
     

Comments