Oreo biscuit cake recipes

Oreo biscuit cake :

oreo biscuit तर सर्वच खातात. पण आज आपण त्या biscuit पासून cake बनवणार आहोत आणि हा  Oreo biscuit cake without oven कसा बनवायचा ते बघूया. 
                                
Oreo biscuit cake recipes
Oreo biscuit cake recipes


Oreo cake बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

ओरिओ बिस्कीट  - २ मोठे पॅकेट, 
बारीक केलेली साखर - १/२ कप ,
दुध  - १/२ कप ,
बेइकिंग पावडर  - १ छोटा चमचा ,
तुप - १ चमचा , 
मैदा - १ चमचा 

Oreo cake बनवण्याची कृती :

प्रथम सर्व ओरिओ बिस्कीट मिक्सर मधुन बारीक करुन घ्या . नंतर ती बारीक केलेले  बिस्कीट एका भांड्यात काढुन घ्या. नंतर त्याला चमच्याने फेटा जेणेकरुन त्यामधला ओलावा नाहीसा होईल.     

नंतर त्यात साखर, बेइकिंग पावडर टाकुन चांगले एकत्र करुन घ्या, नंतर त्यात थोडे थोडे दुध टाकुन ते मिश्रण फेटा . मिश्रण चमच्याने सुटेल असे तयार करा. मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे दुध टाकून फेटा.

नंतर एका स्टीलच्या भांड्यात तूप लावा आणि त्यावर थोडा मैदा टाकुन पसरवा. नंतर त्या भांड्यात ते मिश्रण टाका. नंतर एका कुकर मध्ये २ कप मीठ टाकुन त्याला मोठ्या आचेवर वर १० मिनटं ठेवा. 

कुकर गरम झाला की त्यात एक जाळी ठेऊन त्यावर ते मिश्रणाचे भांडे ठेवा. कुकर वर पॅक बंद असे झाकण ठेवा आणि त्यावर वजनदार वस्तु ठेवा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. ते मिश्रण कुकर(pressure cooker) मध्ये ठेवल्यावर गॅस मध्यम आचेवर ३० मिनिट ठेवा.

३० मिनिटानंतर त्यात चाकू टाकुन बघा त्याला जर ते मिश्रण चिटकले नसेल तर गॅस बंद करुन थोड्यावेळ थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर तो केक काढा. असा आपला स्वादिष्ट Oreo Biscuit Cake or Oreo Cookie Cake तयार. 

आत्ताच आपण बघितल की हा Oreo biscuit cake cooker(pressure cooker) मध्ये कसा बनवला.एकदा नक्की तुम्ही हि रेसिपी करुन बघा. हा Easy and Eggless Oreo Biscuit Cake आवडल्यास नक्की कळवा.  

  

Comments