patta gobhi भाजी मुलांना नको असते. patta gobhi ही पौष्टिक भाजी आहे. ही भाजी मुलांनी खावी ह्यासाठी त्यांचे पालक नेहमी काहीतरी नवीन पदार्थ बनवत असतात. अशीच एक रेसिपी मी चटपटीत रेसिपी मी आज सांगणार आहे. ती आहे patta gobhi pakoda झटपट होणारी हि रेसिपी.
patta gobhi pakoda recipe | instant pakode
patta gobhi pakoda recipe | instant pakode
patta gobhi pakoda बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
पत्ता गोभी - 1 किलो
लसुण - 10 ते 12 पाकऴया
आले - 1 तुकडा
काॅर्नफ़लावर - १/२ कप
मैदा - १ कप
मीठ - चवीनुसार
फूड कलर (orange red)- १ चमचा
patta gobhi pakoda बनवण्याची कृती :
patta gobhi pakoda बनवण्यासाठी, प्रथम प्लेट घ्या त्यात पत्ता गोभी थोडी जाडसर किसुन घ्या. एका बाजुला आले-लसुन मिक्सर मध्ये बारिक करून घ्या. नंतर ते लसुण आलेची पेस्ट आणि मीठ किसलेल्या पत्ता गोभी मध्ये टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.
त्या मिश्रणाला हळुहळु पाणी सुटायला लागेल. नंतर त्या मिश्रणाला पाणी सूटल्यावर त्यात काॅर्नफ़लावर टाका आणि परत ते सर्व मिश्रण चांगले मळुन घ्या.
नंतर त्यात एक एक चमचा मैदा टाका आणि मिक्स करून घ्या. अश्या प्रकारे थोडा थोडा मैदा टाकुन मिश्रण एकजीव करून घ्या. कमीत कमी ह़यात 1 कप मैदा लागतो.
नंतर त्यात ऑरेंज रेड फुड कलर टाका आणि पुर्ण मिश्रण मिक्स करून घ्या. नंतर त्याचा गोळा तयार करून घ्या. लक्षात ठेवा हे पत्ता गोभीच्या पकोड़याचे पीठ जास्त घट़ट मळायच नाही. ह़या पीठाला थोडे पातळच राहुन द़या. त्या पीठात पाणी टाकण्याची गरज नसते.
नंतर एका कढईत तळण्यासाठी तेल टाका. गॅस मोठ़या आचेवर ठेवा आणि तयार केलेल्या पीठाचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे पकोडे तयार करा. नंतर तयार झालेले पकोडे गरम झालेल्या तेलात टाका आणि चांगले लालसर तळुन घ्या
अश्या प्रकारे आपले patta gobhi pakoda तयार आहेत. हे patta gobhi pakodas आवडल्यास नक्की सांगा. हे patta gobhi pakoda शेजवान चटणी सोबत किंवा पकोड़याच्या चटणी सोबत सुद़धा सर्व्ह करू शकता.
टिप : जर पकोडे तळुन झाल्यानंतर नरम पडत असतील तर त्यात थोडा मैदा घालुन मिक्स करा पकोडे मस्त कुरकुरीत होती
Comments
Post a Comment