Methi dhapate recipe | indian recipes


Methi dhapate ह्या रेसिपी ला खूप लोक methi thepla,methi paratha सुद्धा म्हणतात. हे Methi dhapate खाण्यास पौष्टिक, चवदार आणि रुचकर लागतात. हे dhapate कसे बनवायचे ते बघूया. 

Methi dhapate recipe | methi thepla | methi paratha

Methi dhapate recipe | indian recipes
Methi dhapate recipe | indian recipes

Methi dhapate बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मेथी - 1 जुडी
गव्हाचे पीठ - 1 कप
ज्वारीचे पीठ - 1 कप
बेसण - 1/2 कप
तीळ - 1 चमचा
अज्वान - 2 चमचे
आले - 1 तुकडा
लसुण - 4 ते 5 पाकऴया
जिरे - १ चमचा 
धणे पुड - १ चमचा
तेल - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - 2 चमचे
हळद - 1/2 चमचा

Methi dhapate बनवण्याची कृती 

Methi dhapate बनवण्यासाठी, प्रथम मेथी पाण्याने चांगली धुवुन घ्या.  नंतर मेथी चांगली बारीक चिरुन घ्या.  नंतर एका प्लेट घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसण घ्या.  त्यात 2 चमचे तेल टाका सर्व पीठ चांगले एकजीव करुन घ्या. 

एका मिक्सरच्या भांड़यात आले आणि लसुण बारिक करुन घ्या.  ही आले, लसणाची पेस्ट त्या पीठात टाका.  नंतर त्याला चांगले एकजीव करुन घ्या.  

नंतर त्यात अज्वान, तीळ, जीरे, धणे पुड टाकुन चांगले एकजीव करून घ्या. 

नंतर त्यात थोडे - थोडे पाणी टाकून पीठ मऊ भिजवुन घ्या. हे पीठ १५ मिनिटे झाकुण ठेवा.  15 मिनिटानंतर त्याचे चपाती सारखे धपाटे लाटून घ्या.  

नंतर एका बाजुला तवा ठेवा.  तव्यावर थोडे तेल पसरवा.  नंतर त्यावर लाटलेली Methi dhapate टाका  आणि चांगले लालसर भाजुन घ्या. अश्या प्रकारे सर्व Methi dhapate चांगले भाजून घ्या. 

नंतर गरम - गरम Methi dhapate दह्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा. ते चटपटीत Methi dhapate नक्की करून बघा आणि हे Methi dhapate आवडल्यास नक्की कंमेंट करून सांगा.   

टीप : धपाटे भाजताना तुम्ही त्यावर तेल किंवा तुप लावुन शकतात.  

Comments