जेवण बनवण्यात आपण किती जरी expert असलो तरी कधीना कधी आपल्या कडून छोट्या छोट्या चुका होतातच. कधी जेवणात मीठ जास्त पडत तर कधी तिखट, दही बनवायचं आहे पण घरात दही उपलब्ध नाहीये. तांदळाचा भात तर बनतो पण तो चिकट. अश्या अनेक अडचणीची माझ्याकडे काही Best Kitchen Tips आहे तर ते बघुया.
Kitchen Tip १: बिना दहीच दही कस बनवायचं :
कधी तुम्ही बिना दहीच दही बनवलं आहे? नाही ना तर ते कसे करायचे ते बघुया. त्यासाठी दूध कोमट तापवून घ्या . त्यात दोन देठच्या मिरच्या टाका आणि १०-१२ तास झाकून ठेवा. नंतर तयार झालेले मिश्रण दही बनवण्यासाठी वापरा.
Kitchen Tip २: जर जेवणात मीठ जास्त झाले तर काय कराल :
ह्यासाठी सोपी टीप आहे. जर पातळ भाजी किंवा सूप मध्ये मीठ जास्त झाले. तर त्यात सोललेला बटाटा टाका. त्यामुळे त्यातील खारट पणा निघून जाईल. किंवा मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा खारट पणा कमी होईल.
जर भाजी सुक्की असेल तर त्यात बेसन टाका. त्याने खारट पणा कमी होईल.
Kitchen Tip ३: भात चिकट बनतो, तर मोकळा कसा करायचा:
भात बनवतांना त्यात नेहमी लिंबूचे ४-५ थेंब टाकायचे त्याने भात मोकळा बनतो आणि चवीला पण छान लागतो . किंवा भात बनवतांना त्यात थोडे तेल टाकले तरी भात मोकळा बनतो .
त्याचा उपयोग घरातल्या दरवाजे,खिडक्यांचे काच पुसायला होऊ शकतो. किंवा तुम्ही त्याला झाडांच्या मातीत पण टाकू शकतात त्यात त्याचा खात म्हणून उपयोग होऊ शकतो.
Kitchen Tip ५: चॉकलेट पावडर जसे बौर्नविटा , कॉफी, अश्या घट्ट गोळा बनवण्यापासून कसे वाचवाल :
नेहमी अश्या पावडरला हवा बंद डब्ब्यात ठेवा आणि वापरतांना सुक्क्या चमच्याचा वापर करा. त्यामुळे त्याचे घट्ट गोळा तयार होणार नाही.
Kitchen Tip ६: जर जेवणात तिखट जास्त झाल तर काय कराल :
आपण जेवण बनवतांना तिखट कमी टाकतो पण जर अद्रक किंवा मसाले टाकले तर त्याचा तिखट पणा वाढतो. हा तिखट पणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स. जर तिखट जास्त झाले असेल तर त्यात दुधा सारखे पदार्थ टाकावे जसे दूध,दही,ताक, क्रीम. ह्यामुळे भाजीमधील तिखट पणा कमी होतो. पण लक्षात ठेवा कोणताही दुधाचा पदार्ध टाकल्यावर जास्त वेळ ते गरम नाही करायचा त्याने दूध, दही फाटण्याची शक्यता असते.
Kitchen Tip ७: लसूण सोलण्याचा सोपा उपाय:
लसूण सोलण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात लसणाच्या पाकळ्या १ तासासाठी भिजत ठेवा. १ तासानंतर ते काढा आणि त्याला दाबा त्याचे साल निघून जाईल. किंवा जर घाईत असेल तर तव्यावर लसूण भाजून घ्या. ह्यामुळे पण लसूनचे साल निघून जाईल.
Garlic best kitchen tips |
Kitchen Tip ८: पास्ता किंवा नूडल्स करतांना ते एकमेकांना चिटकतात. त्यासाठी काय कराल:
पास्ता किंवा नूडल्स करतांना'त्यात १-२ चमचे तेल टाका . नंतर शिजल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या. त्याने ते वेगवेगळे होईल.
Kitchen Tip ९: कधी कधी फ्रिजमध्ये जास्त पदार्थ ठेवले किंवा पडले असेल तर त्यातून वास येतो त्यासाठी काय केले पाहिजे:
एक न्यूज पेपर घ्या त्यावर पाणी शिंपडा आणि त्याचा गोळा बनवून फ्रिजच्या मध्यम भागी ठेवा. ७-८तास फ्रिज उघडू नका. ७-८ तासानंतर फ्रिज उघडा आणि तो गोळा काढून घ्या. त्यामुळे त्यातील सर्व वास निघून जाईल.
Kitchen Tip १०: चपाती जर कडक होत असेल तर काय करायचे:
चपातीचे पीठ भिजवताना पाण्याच्या जागी दुधाचा वापर करा, त्याने चापट मऊ येतील आणि कडक होणार नाही.
कसे वाटले kitchen tips ? एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. kitchen tips आवडल्यास कंमेंट करून नक्की कळवा.
Homemade pizza recipes
how to make Coconut Laddu Recipe within 15 minutes at home
how to make homemade cake recipes - No Oil,No butter,No egg
chapati best kitchen tips |
कसे वाटले kitchen tips ? एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. kitchen tips आवडल्यास कंमेंट करून नक्की कळवा.
Homemade pizza recipes
how to make Coconut Laddu Recipe within 15 minutes at home
how to make homemade cake recipes - No Oil,No butter,No egg
Great tips to cook traditional Indian food, we give authentic Indian taste in sydney. Contact us and know more.
ReplyDelete