Dhaba style matar paneer recipe



शाकाहारी लोकांसाठी पनीर हा आवडता पदार्थ. त्यात Matar paneer तर सर्वात आवडत. आज मी Restaurant style matar paneer कसे बनवायचे ते मी सांगणार आहे ते पण सोप्या पद्धतीमध्ये.    

Dhaba style matar paneer recipe

Dhaba style matar paneer recipe
Dhaba style matar paneer recipe

Dhaba style matar paneer  बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

चिरलेला कांदा - १
चिरलेला टोमॅटो - १
आले-लसूनची पेस्ट - २ चमचे 
हिरवी मिरची - २ 
तेल - ४ चमचे 
जिरे - १ चमचा 
लालतिखट - १ १/२ चमचा 
हळद - १/२ चमचा 
धने पावडर - १ चमचा 
पनीर - २०० ग्राम 
मटर - १ कप 
पाणी - १ ते १ १/२ कप 
तेल - तळण्यासाठी 

Dhaba style matar paneer बनवण्याची कृती :

Matar paneer बनवण्यासाठी, प्रथम एक कढई घ्या. त्यात २ चमचे तेल टाका. तेल थोडे गरम झाले की त्यात चिरलेला कांदा टाका. कांदा थोडा लालसर करून घ्या. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो आणि आले लसूनची पेस्ट टाका.  

नंतर चांगले हलवून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात. त्या सोबतच त्यात हिरवी मिरची कापून टाका आणि चांगले एकत्र करून घ्या. 

२-३ मिनिटासाठी झाकून ठेवा. २-३ मिनिटानंतर गॅस बंद करा. ते शिजलेले मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या.

एका बाजूला पनीरचे हवे तसे तुकडे करा. नंतर एका कढईत तेल टाका. त्यात  तुकडे केलेले पनीर टाका आणि चांगले खरपूस तळून घ्या.   

एका बाजूला, एका कढईत २ चमचे तेल टाका.त्यात जिरे टाका. जिरे थोडे तडतड  झाले की त्यात लाल तिखट टाका. 

लाल तिखट टाकल्याबरोबर त्यात तयार केलेले कांदे - टोमॅटोचे मिश्रण टाका. जेणे करून लालतिखट जळणार नाही. नंतर त्याला चांगले हलवून घ्या. 

त्या नंतर त्यात धने पावडर आणि हळद टाकून चांगले मिक्स करून घ्या. नंतर त्या मिश्रणाला २-३ मिनिटासाठी झाकून ठेवा. 

२-३ मिनिटानंतर झाकण काढा आणि गॅस मोठ्या आचेवर करा. त्या मिश्रणाला चांगले हलवा जो पर्यंत मिश्रण पहिल्यापेक्षा अर्धे होत नाही तो पर्यंत. 

नंतर त्या मिश्राला थोडे वरून तेल सुटायला लागले की त्यात मटर टाका. त्यात १ मिनिट चांगले हलवून घ्या. नंतर त्यात पनीर टाका. 

नंतर त्या मिश्रणाला चांगले होऊन घ्या. नंतर त्यात पाणी टाका आणि पुन्हा ते मिश्रण हलवून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे गॅस मोठ्या आचेवर शिजत ठेवा.
 
Matar paneer चांगले शिजले की गॅस बंद करा. नंतर सर्वांना गरम गरम dhaba style matar paneer सर्व्ह करा. हे Matar paneer तुम्ही तंदुरी रोटी सोबत खाऊ शकतात. 

ही dhaba style matar paneer recipe नक्की करून बघा. जर ही Matar paneer रेसिपी आवडली असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

Comments