पंजाब मधील Chhole Bhature ही फेमस रेसिपी आहे. हे मसालेदार Chhole Bhature बघून तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटत. हे स्वादिष्ट Chhole Bhature Recipe कसे बनवायचे ते बघूया.
Chhole Bhature Recipe | Indian Recipes
Chhole Bhature Recipe बनवण्याचे साहित्य -
काबूली चणे - ४ ते ५ तास भिजलेले २५० ग्रॅम,
बारीक चिरलेले कांदे - २,
बारीक चिरलेले टोमॅटो - २,
खडा मसाला - २ तेजपत्ते, १ मसाला वेलची, ४ लवंग, ७ काळीमीरी,१ tsp राई, १ tsp जीरे,
लाल तिखट - २½ tbsp,
गरम मसाला - १ tsp,
हळद - ½ tsp ,
हिंग - ¼ tsp ,
काडिपत्ते - ७-८ ,
भाजलेले सुके खोबरे - ¼ कप ,
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ cup,
लसूण पाकळ्या - ६/७ ,
आले - छोटा तुकडा ,
२ हिरव्या मिरच्या,
तेल - ६ चमचे,
मीठ - चवीनुसार .
भटुरे बनवण्यासाठी साहित्य -
मैदा - २½ कप ,
दही - ¼ कप,
खायचा सोडा- ¼ tsp ,
तेल - ¼ tsp ,
हलके कोमट पाणी - ½ कप,
बारीक रवा -½ कप ,
साखर - १ tsp ,
मीठ - १ tsp ,
तेल - तळण्यासाठी .
Chhole Bhature Recipe बनवण्याची कृती -
Chhole Bhature बनवण्यासाठी, प्रथम एका परातीत मैदा घ्या, नंतर त्यात दही, रवा, साखर, खायचा सोडा आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्या.नंतर यात पाणी मिक्स करून चपातीला मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट गोळा मळून घ्यावा.
गोळा मळून झाल्यावर त्यावर थोडे तेल फिरवून घ्या म्हणजे गोळा कोरडा पडणार नाही. आता पीठ २ तासासाठी मुरवत ठेवा. एका बाजूला कुकरच्या भांड्यात भिजलेले काबुली चणे टाका, त्यात १½ ग्लास पाणी आणि ½ tsp मीठ घालून कुकरला ३ शिट्ट्या घ्या.
नंतर मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर आणि मिरची यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे.
नंतर एका कढईत तेल गरम करा , नंतर त्यात राई, जीरे, खडा मसाला घालून हलका परतून घ्या. त्यानंतर त्यात कडीपत्त्याची पाने आणि कांदा टाका आणि चांगला हलवून घ्या. कांदा मऊ झाला कि यात टोमॅटो घाला. आता कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्या.
त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद घालवून मसाला फोडणीत चांगला हलवा. मसाला परतल्यानंर यात तयार केलेले सुके खोबरे - लसूणचे मिश्रण घाला आणि त्याला २/३ मिनिटे चांगले हलवा.
त्यानंतर यात उकडलेले काबूली चणे पाण्यासहीत घाला ( चण्याचे पाणी रस्सा जीतका घट्ट किंवा पात्तळ हवा असेल त्यानुसार घालावा. ) नंतर त्यात गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करा.
आता त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजून द्यावे, त्यानंतर गॅस बंद करावा. ( फोडणी करताना गॅस मंद आचेवर करावा, मिश्रण घातल्यावर गॅस मध्यम आचेवर करावा आणि शेवटी शिजवताना गॅस पुन्हा मंद आचेवर करावा. ) संपूर्ण भाजी ३० मिनिटांत तय्यार होते.
२ तासानंतर भटुर्याचे पीठ पुन्हा चांगले मळून घ्या. नंतर हव्या त्या आकारात गोळे तयार करून चपातीपेक्षा जाड लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व भटुरे तयार करा.
नंतर एका बाजूला कढईत तेल टाका, तेल चांगले गरम करून घ्या. गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. भटुरा फुलला कि दुसऱ्या बाजूने तळून घ्या. दोन्ही बाजूने हलका सोनेरी तांबूस रंग आणावा. तयार गरमागरम छोले भटुरे कांदा लिंबूसोबत सर्व्ह करा.
कशी वाटली ही Chhole Bhature Recipe? एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल, एकदा हि घरगुती Chhole Bhature खाल्ल्यावर हॉटेल मधील Chhole Bhature विसरून जाईल.
टीप : तुम्ही भटुर्याच्या पीठामध्ये अज्वाईन टाकू शकतात त्याने भटुर्यांना चव छान येते.
Comments
Post a Comment