स्वादिष्ट, लवकर आणि सोपे Chocolate Rava Ladoo 15 मिनिटांच्या आत तयार केले जाऊ शकतात. हे Chocolate Rava Ladoo मावाशिवाय आणि दुधाच्या पावडरशिवाय बनविता येतात. तरी सुद्धा ह्याची चव दुकानातून आणलेल्या मिठाईच्या चवी सारखी येते. ह्या रेसिपीला आपण Chocolate Roll सुद्धा बोलू शकतो. हे Chocolate Roll कसे बनवायचे ते पाहूया.
chocolate rolls |
टीप :
- Chocolate Rava Ladoo बनवण्यासाठी तुम्ही जाड किंवा बारीक रवा वापरू शकतात.
- माप योग्य येण्यासाठी तुम्ही एका कपाचा वापर करा. जेणेकरून Ladoo परफेक्ट होईल.
- रवा चांगला भाजला गेला कि नाही हे समजायचं असेल तर, त्याचा खमंग सुगंध येईल आणि तो लालसर दिसायला लागेल.
- Chocolate Rava Ladoo मध्ये कोको पावडर टाकतांना ती चाळून टाका. त्याने कोको पावडर हलकी होते आणि रव्यामध्ये लवकर मिक्स होते.
- Ladoo च्या मिश्रणा मध्ये दुध मिक्स करताना रूमच्या तापमानात असणे गरजेचे आहे.
- त्या मिश्रणात मध्ये फक्त ३/४ कप दुधाचा वापर करायचा त्यापेक्षा जास्त वापरू नये.
- Chocolate Rava Ladoo मध्ये जर व्हॅनिला एस्सेन्सचा स्वाद आवडत नसेल तर त्या ऐवजी तुम्ही इलायची पूड सुद्धा वापरू शकतात.
- हे मिश्रण गरम गरम असतांना त्याचे rolls बनवून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे rolls बनवायला अडचण येईल.
- किसलेल्या खोबऱ्याचा वापर तुम्ही त्या मिश्रणात मिक्स करण्यासाठी सुद्धा करू शकतात. नंतर त्याचे Ladoo बनवू शकतात.
Chocolate Rava Ladoo बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
तूप/बटर - 4 चमचे
रवा - 1 कप
कोको पावडर - 1 चमचा
दूध - 3/4 कप
साखर - १/२ कप
व्हॅनिला एस्सेन्स - 1/2 चमचा
किसलेला खोबरे - सजावटीसाठी
Chocolate Rava Ladoo बनवण्याची कृती :
chocolate roll बनवण्यासाठी, प्रथम गॅसवर एक कढई ठेवा. नंतर त्यात ४ चमचे तूप किंवा बटर टाका. तूप थोडा गरम झाल्यावर त्यात १ कप राव टाका. त्यावेळेस गॅस बारीक ते मध्यम आचेवर ठेवा. नंतर रवा चांगला हलवून घ्या. रवा लालसर होऊ पर्यंत हलवा.
नंतर त्यात कोको पावडर टाका. कोको पावडर टाकल्यावर दोन्ही साहित्यांना १ मिनिट पर्यंत चांगले हलवून घ्या. कोको पावडर रव्यामध्ये मिक्स झाल्यावर १ मिनिटानंतर गॅस बंद करा.
नंतर त्या मिश्रणात ३/४ कप दूध मिक्स करा. ते दुध त्या मिश्रणात चांगले मिक्स करा. ते मिश्रण दुध सोकूपर्यंत चांगले हलवून घ्या. नंतर त्या मिश्रणात १/२ कप साखर टाका. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकु शकतात.
मिश्रणात साखर चांगली मिक्स करून घ्या. साखर विरघळया नंतर त्या मिश्रण चांगले घट्ट होऊ पर्यंत हलवा.
नंतर मिश्रणात 1/2 चमचा व्हॅनिला एस्सेन्स टाका. नंतर ते सव मिश्रणात एकत्र करून घ्या. नंतर गॅस बंद करा.
नंतर मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्या. नंतर त्याचे हवे त्या आकाराचे ladoo किंवा rolls बनवून घ्या. नंतर एका प्लेट मध्ये किसलेले खोबरे घ्या त्यात तयार झालेले rolls टाका आणि सर्व बाजूने त्याला किसलेले खोबरे लावून घ्या.
अश्या प्रकारे स्वादिष्ट, हलवाई सारखी मिठाई तयार.
मित्रांनो ही रेसिपी तुम्ही कोणत्याही उत्सवात बनवून पहा मला खात्री आहे की एकदा ते बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही हे चॉकलेट रोल बनवणार. घरच्या घरी हे चॉकलेट रोल्स रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्कीच ते आवडेल.
Comments
Post a Comment