schezwan sauce recipe | Indian recipes



schezwan sauce ही chinese डिश आहे. पण आता भारतामध्ये पण त्याचे वेड लागले आहे. खूप लोक कटलेट्स, भजी अश्या पदार्थांसोबत schezwan sauce खातात. हि chinese डिश आपल्या indian पद्धतीने कशी बनवायची ते बघूया.   

schezwan sauce recipe | Indian recipes

schezwan sauce recipe | Indian recipes
schezwan sauce recipe | Indian recipes

schezwan sauce recipe बनवण्याचे साहित्य:

बेगाडी मिर्च - 50 ग्रॅम
गरम पाणी - 1 कप
तेल - 1/4 कप
बारीक चिरलेले आले - 1 चमचा 
बारीक चिरलेले लसूण - 1 चमचा
टोमॅटो सॉस - 1 चमचा
व्हिनेगर - 1 चमचा
मीठ - चवीनुसार

schezwan sauce बनवण्याची कृती 

schezwan sauce बनवण्यासाठी बेगाडी मिरच्या घ्या. त्यांचे देठ काढून टाका, त्या मिरच्याचे अर्धे तुकडे करा आणि त्याचे बिया काढून घ्या. नंतर एका भांड्यात १ कप गरम पाणी टाका त्यात त्या मिरच्या सुमारे १/२ तास  भिजवा. 

१/२ तासानंतर त्या मिरच्या भिजून थोड्या फुगत. या भिजवलेल्या मिरच्या ब्लेंडर जारमध्ये बारीक करून घ्या किमान २-३ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवा (त्यामुळे त्यात पाण्याची गरज लागणार नाही ). त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यात जास्त पाणी घालू नका. आवश्यक असल्यास सुमारे 1-2 टिस्पून पाणी घाला.

नंतर एका बाजूला कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर आले आणि लसूण घाला. ते थोड्यावेळ हलवून घ्या. त्याला सोनेरी कलर येऊ पर्यंत त्याला हलवा. 

नंतर त्यात बारीक केलेली मिरची टाका. ते मिश्रण सर्व एकत्र करा. त्या मिश्रणाला तेल सुटूस पर्यंत हलवा. कमीत कमी त्या मिश्रणाला ५-६ मिनिटे हवावी लागेल. त्यानंतर त्या मिश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. 

नंतर त्यात टोमॅटो सॉस, व्हिनेगर, चवीनुसार मीठ टाकून चांगले हलवून घ्या. ह्या schezwan sauce ७-८ मिनिटे मोठ्या आचेवर हलवून घ्या. त्या सॉसच्या वरती तेल दिसायला लागले की गॅस बंद करा. 

schezwan sauce थंड झाला कि हवा बंद भांड्यात तुम्ही त्याला ठेऊ शकतात. हा schezwan sauce १-१ १/२ महिना राहू शकतो. 

अश्या प्रकारे चविष्ट schezwan sauce तयार झाला. नक्की हा schezwan sauce करून बघा.      

टीप:आपण बेगाडी मिराचीशिवाय इतर कोणत्याही मिरच्या वापरू शकता.     

Comments