रोटी, चपाती तर नेहमीच आपण खातो. त्यात ढाब्या वरची tandoori roti तर चवच वेगळी. अशीच dhaba style tandoori roti आज मी तुम्हाला सांगणार आहे.
Tandoori roti recipe | Indian Recipes
tandoori roti बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
मैदा -१ कप
गव्हाचे पीठ - १/२ कप
दही - २ चमचे
साखर - १ चमचा
खाण्याचा सोडा - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
तूप - ५ चमचे (असली घी)
tandoori roti बनवण्याची कृती :
tandoori roti बनवण्यासाठी, प्रथम एक भांडे घ्या त्यात १ कप मैदा, १/२ गव्हाचं पीठ, दही, साखर,खाण्याचा सोडा,मीठ आणि तूप टाका. सर्व मिश्रण हाताने एकत्र करून घ्या.
तंदुरी रोटी मध्ये गव्हाचे पीठ टाकल्यामुळे त्याला चांगली चव येते आणि पचण्यासाठी पण सोपी होते. ते मिश्रण हाताने मळून घेतल्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी टाकून त्याला मळून घ्या.
हे पीठ मऊ व चपातीसारखे मळून घ्या (नाही जास्त पातळ नाही घट्ट). एक रुमाल ओला करा आणि त्या पीठावर १५ मिनिटासाठी झाकून ठेवा.
१५ मिनिटानंतर ते पीठ फुललेले दिसेल . त्या पीठाला २ चमचे तेल टाकून मळून घ्या. त्याचा मऊ गोळा बनून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
नंतर त्याचे गोल रोट्या लाटून घ्या. त्या रोटीला बनवतांना जास्त पीठ लावू नका. रोटी लाटून झाल्यावर रोटीला एका बाजूला थोडे पाणी लावा.
एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्या गरम झालेल्या तव्यावर पाण्याची बाजू असलेली रोटी टाका. गॅस मध्यम आचेवर ठेवा. एका बाजूने ती रोटी चांगली भाजून घ्या. नंतर त्या रोटीचा ताव गॅस वर उलट करा आणि रोटीची वरची बाजू चांगली भाजून घ्या. रोटीला पाणी लावल्यामुळे ती रोटी तव्याला चिटकून राहील. अश्या प्रकारे सर्व रोट्या भाजून घ्या. सर्व रोट्या भाजून झाल्यावर वरून त्याला तूप लावा.
ह्या tandoori roti तुम्ही कोणत्याही मसाल्याच्या भाजी सोबत खाऊ शकतात. ही tandoori roti एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल.
Comments
Post a Comment