Cake recipe of rava and maid :
आज मातृ दिन ह्या निम्मिताने सर्वांना आईसाठी काहीतरी नवीन करायचं असत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी सोपी अशी cake recipe घेऊन आली. मी तुम्हाला वेगवेगळ्या सोप्या पद्धतीने घरात जे सामान असत त्या मधूनच ही रेसिपी होईल अशी रेसिपी मी सांगणार आहे .
Easy cake recipe of rava and maida |
आता आपण rava maida cake without oven घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत.
rava cake recipe बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
रवा - १ कप,
मैदा - १/२ कप ,
साखर - १ १/२ कप ,
दही - १/२ कप ,
तेल - १/२ कप ,
बेइकिंग पावडर - १ छोटा चमचा ,
बेइकिंग सोडा - १/२ छोटा चमचा,
वॅनिला एस्सेन्स - गरजेनुसार ,
तूप - १ चमचा,
फुड कलर - आवश्यकतेनुसार.
cake recipe बनवण्याची कृती :
प्रथम साखर मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर रवा,मैदा ,बारीक केलेली साखर चाळणीमध्ये टाकून चाळून घ्या.
नंतर एका भांड्यात ते चाळलेले मिश्रण टाका. त्यात दही, तेल आणि गरजेनुसार थोडे दुध घालून फेटून घ्या. मिश्रण चमच्याने सुटेल असे तयार करा.
मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे दुध टाकून फेटा. हे तयार झालेले मिश्रण अर्धातास तसेच झाकुन ठेवा.
अर्धातासानंतर त्या मिश्रणात बेइकिंग पावडर , बेइकिंग सोडा, वॅनिला एस्सेन्स, फुड कलर त्यात टाकून ते मिश्रण चांगले फेटून घ्या. नंतर एका स्टीलच्या भांड्यात तूप लावा आणि त्या भांड्यात ते मिश्रण टाका.
नंतर एका कुकर मध्ये २ कप मीठ टाकुन त्याला मोठ्या आचेवर वर १० मिनटं ठेवा . कुकर गरम झाला की त्यात एक जाळी ठेऊन त्यावर ते मिश्रणाचे भांडे ठेवा.
कुकर वर पॅक बंद असे झाकण ठेवा आणि त्यावर वजनदार वस्तु ठेवा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. ते मिश्रण कुकर मध्ये ठेवल्यावर गॅस कमी आचेवर ४५ मिनिट ठेवा.
४५ मिनिटानंतर त्यात चाकू टाकुन बघा त्याला जर ते मिश्रण चिटकले नसेल तर गॅस बंद करुन थोड्यावेळ थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर तो केक काढा. असा आपला चविष्ट बेकरी सारखा घरच्या घरी रवा मैदा केक रेसिपी तयार.
Chocolate cream बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
कोको पावडर - १/२ कप
कॉर्न फ्लोअर - २ चमचे
साखर - १/२ कप
मीठ - चिमुठभर
दुध - १ कप
बटर - १ चमचा
व्हॅनिला एस्सेन्स - १ चमचा
Chocolate cream बनवण्याची कृती :
प्रथम एका भांड्यात घ्या. त्यात कोको पावडर , कॉर्न फ्लोअर, साखर, मीठ चांगले एकत्र करून घ्या.
नंतर त्यात दूध टाकून चांगले फेटा. एका बाजूला गॅसवर कढई ठेवा. त्यात तयार केलेले मिश्रण टाका.
नंतर गॅस बारीक आचेवर ठेवा. त्या मिश्रणाला सतत हलवा जो पर्यंत ते मिश्रण घट्ट नाही होत तो पर्यंत.
मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करा. नंतर त्यात १ चमचा बटर टाका आणि त्या मिश्रणात एकत्र करून घ्या.
नंतर त्यात व्हेनिला एस्सेन्स टाका आणि परत ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. अश्या प्रकारे चॉकलेटे क्रीम रेडी.
आत्ताच आपण बघितल की हा rava - maida cake cooker मध्ये कसा बनवला. हा eggless rava cake आवडल्यास नक्की कळवा.
टीप : तुम्ही हा केक कढईमधे सुद्धा करु शकतात.
Comments
Post a Comment