Homemade Coconut Laddu | ready in 15 minutes


गोड सर्वांनाच आवडतआणि कधीकधी आपल्याला चविष्ट असं गोड खावं वाटत. ह्या रेसिपीला फक्त ३ साहित्यांची गरज आहे आणि Homemade Coconut Laddu रेसिपी झटपट बनते.

coconut ladoo बनवण्यासाठी फक्त ३ साहित्य लागतात. ही रेसिपी भारताच्या गोड पदार्थामधली सर्वात सोपी आणि लवकर बनणारा पदार्थ आहे. हे ladoo १५ मिनिटाच्या आत तुमच्या समोर तयार होऊन जातात. 

Homemade Coconut Laddu
Indian Recies - Indian cooking
Homemade Coconut Laddu

coconut ladoo खाण्यास स्वादिष्ट लागतात.  हे साखर, नारळ(किसलेले खोबरे) आणि इलायची पावडरने बनवले जातात. सण उत्सवामध्ये ही रेसिपी झटपट बनवता  येते.

Coconut Laddu बनवण्यासाठी टिप 

जर मार्केट मधील Desiccated coconut मिळत नसेल तर तुम्ही घरातील किसलेले खोबरे सुद्धा वापरू शकतात. 

जर तुम्हाला शाही ladoo बनवायचे असेल तर त्यात तुम्ही काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून टाकू शकतात. 
 
जर ladoo तुम्हाला creamy बामवायचे असेल तर त्यात तुम्ही condensed milk or milkmade वापरू शकतात. 

लाडू मध्ये तुम्ही साखरे ऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकतात. 

असे अनेक पर्यायी साहित्य आहेत ज्यांना आपण या नारळाच्या लाडूमध्ये जोडू शकतो आणि त्यांची चव चांगली बनवू शकतो.जसे मिल्क पावडर, खोया, तीळ पावडर असे काही साहित्य आपण त्यात टाकू शकतो. 

Homemade Coconut Laddu बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

खोबऱ्याचा बारीक किस(desiccated coconut) : २ कप 
साखर - चवीनुसार 
इलायची - २
फुड कलर - गरजेनुसार 

Homemade Coconut Laddu बनवण्याची कृती :


Homemade Coconut Laddu बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात खोबऱ्याचा बारीक किस(desiccated coconut) आणि साखर चांगली एकत्र करून घ्या . 

desiccated coconut and sugar
Indian Recies - Indian cooking
desiccated coconut and sugar


नंतर गॅस कमी आचेवर ठेवून त्यावर कढई ठेवा. नंतर त्यात एकत्र केलेले मिश्रण टाका आणि त्याला चमच्याने हलवा. 

नंतर इलायची चांगली बारीक करून घ्या आणि ती इलायची त्या मिश्रणात टाका. 

त्या मिश्रणाला सतत हलवत राहा जेणे करून ते कढईला लागणार नाही.नंतर त्या मिश्रणात गरज असल्यास फुड कलर टाका जेणे करून आपल्या लाडूंना चांगला कलर येईल. 

१० ते १२ मिनिट ते मिश्रण चांगले हलवा. मिश्रणातली साखर चांगली मिक्स झाल्यावर गॅस बंद करा आणि ते मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्या. 

नंतर त्याचे छोटे छोटे लाडू बांधुन घ्या. अश्या प्रकारे गोड, स्वादिष्ट Homemade Coconut Laddu तयार. 

हे लाडू नक्की करून बघा चवीला अतिशय छान लागतात तुम्हाला सुद्धा आवडेल. आवडल्यास कंमेंट करून नक्की कळवा . 

Comments