ओव्हनशिवाय घरगुती वस्तूसह सोपी Homemade Pizza बनवा. हे पिझ्झा खाल्ल्यानंतर बाहेरील पिझ्झा विसरून जाईल.
Indian recipes - Indian cooking Homemade Pizza |
Homemade Pizza रेसिपीसाठी लागणारे साहित्य :
बारीक चिरलेला टोमॅटो - ६-७
बारीक चिरलेला कांदा - ३
बारीक चिरलेला शिमला मिर्ची - २
किसलेली पत्ता गोबी - १/२
आल लसणाची पेस्ट - २ चमचे
कॉर्नफ्लोअर - ३ चमचे
लाल तिखट - १ १/२ चमचे
गरम मसाला - १ १/२ चमचे
साखर - १ १/२ चमचे
मीठ - चवीनुसार
तेल - ३ चमचे
जिर -१ चवीनुसार
टोमॅटो सॉस - आवश्यकतेनुसार
बटर /असली तूप - आवश्यकतेनुसार
चीज - आवश्यकतेनुसार
Homemade Pizza रेसिपी बनवण्याची कृती :
Homemade Pizza बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तेल टाकल्यानंतर गॅस माध्यम आचेवर ठेवा . नंतर त्यात जिरे टाका. थोडे जिरे तडतड झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका . कांदा थोडा लाल झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका. त्या टोमॅटोला पाणी सुटेल. ते पाणी निघून गेले की त्यात शिमला मिर्ची टाका.
नंतर त्या मिश्रणाला चमच्याने हालवा.नंतर एका बाजुला पत्तागोबीचे सर्व पाणी काढून टाका. नंतर त्यात ती पत्तागोबी टाका आणि सोबतच लाल तिखट, गरम मसाला, साखर, मीठ टाकून चांगले हलवून घ्या.
नंतर एका वाटीत ५ चमचे पाणी घ्या आणि त्यात कॉर्नफ्लॉवर टाकून हलवून घ्या आणि ते कॉर्नफ्लोअरचे पाणी मिश्रणामध्ये टाका. १० मिनिट गॅस कमी आचेवर ठेवा . १० मिनिटानंतर गॅस बंद करा.
Homemade Pizza तयार करण्यासाठी पिझ्झा बेस वर टोमॅटो सॉस लावा आणि त्यावर तयार केलेले मिश्रण सर्व बाजूने पसरवा. नंतर त्यावर चीज किसा.
नंतर गॅसवर ताव ठेवा त्यावर बटर किंवा असली तूप टाका नंतर त्यावर तयार केलेला पिझ्झा बेस ठेवा आणि गॅस कमी ठेवा. पिझ्झा बेस खालून लालसर होऊ पर्यंत ठेवा. अश्या प्रकारे सर्व पिझ्झा बेस तयार करून घ्या आणि त्याचे तुकडे करून सर्वना Homemade Pizza खाऊ घाला.
टीप : जर अजिनोमोटो असेल तर तुम्ही ते सुद्धा त्या मिश्रणात टाकु शकतात.
जर तुमच्याजवळ धने जिरा पूड असेल तर ती सुद्धा तुम्ही मिश्रणात टाकू शकतात.
Comments
Post a Comment