Khamang Dhokla Recipe

Make Delicious Khamang Dhokla Recipe 

बनवा स्वादिष्ट खमंग ढोकळा घरच्याच साहित्यासोबत अगदी थोड्याच वेळात. खमंग ढोकळा ही रेसिपीस गुजरात सोबत खूप साऱ्या राज्यात आवडती झाली आहे. तर ती कशी करायची हे बघूया.   

साहित्य :  
बेसन - २ कप 
रवा - १/२ कप 
लिंबू पॉवडर - १ चमचा 
साखर - ८ चमचे 
मीठ - चवीनुसार 
इनो - २ चमचे 
तेल - १ चमचा 
बेइकिंग सोडा - छोटा १/२ चमचा 
हळद - छोटा १/२ चमचा 
पाणी - १ १/२ कप 

                                         
Indian recipes - Indian cooking
Khamang Dhokla Recipe 


कृती :
प्रथम बेसन आणि रवा चाळून घ्यावा. नंतर त्यात मीठ ,तेल ,हळद आणि १ कप पाणी टाकुन ते मिश्रण थोडे घट्ट भिजवावे. 

नंतर एका भांडयात लिंबू पावडर ,साखर आणि १/२ कप पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. 

एका बाजूला गॅस वर कढई ठेवावी . त्यात ३ ग्लास पाणी टाकावे नंतर त्यात एक जाळीचा स्टॅन्ड ठेवावा आणि त्यावर एका ताटाला तेल लावून गरम होण्यासाठी ठेवावा.
  
नंतर बेसनाच्या मिश्रणात साखर लिंबूचे पाणी टाकुन फेटावे. हे मिश्रण चमच्याने सुटेल असे तयार करून घ्यावे . मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालून फेटावे . 

नंतर त्यात बेअकिंग सोडा आणि इनो टाकुन फेस येऊ पर्यंत ते मिश्रण फेटावे. आता हे मिश्रण गरम झालेल्या ताटात टाकावे. कढई वर पॅक बंद असे झाकण ठेवा जेणे करून त्यामधील गरम वाफ बाहेर जाणार नाही. ते मिश्रण कढई मध्ये ठेवल्यावर गॅस मोठ्या आचेवर २० मिनिट ठेवा.
     
२० मिनिटानंतर त्यात चाकू टाकुन बघा त्याला जर ते मिश्रण चिटकले नसेल तर गॅस बंद करुन थोड्यावेळ थंड करायला ठेवा. एका बाजूला फोडणीची तयारी करा . 

फोडणी साठी लागणारे साहित्य :
तेल - आवशक्यतेनुसार
राई - आवशक्यतेनुसार 
साखर  - २ चमचे 
कडीपत्ता - ५-६ पत्ते 
पाणी -  ३ चमचे 

कृती : 
एका कढईत तेल गरम करून त्यात राई , साखर , कडीपत्ता आणि पाणी घालून  फोडणी तयार करून घ्यावी .

नंतर ही फोडणी तयार झालेल्या ढोकळावे टाकावी आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्वांना द्यावी.  

अशी आपली स्वादिष्ट,टेस्टी गुजराती Khamang Dhokla Recipe तयार. ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास कंमेंट मध्ये सांगा. 

Comments