Palak puri and palak puri chutney recipes


लहान मुलांना पालेभाज्या बिकलकून आवडत नाही.त्या मध्ये मेथी तर मुळेच आवडत नाही. पण ह्या पालक पासून palak puri  कश्या करायच्या ते मी आज सांगणार आहे. ही  palak puri and palak puri chutney करायला पण सोपी आणि खायला पण चविष्ट आहे. लहान मुले  सुद्धा ही  palak puri and palak puri chutney आवडीने खातात. हि palak puri कशी करायची ते बघूया. 

Palak puri and palak puri chutney recipes

Palak puri and palak puri chutney recipes
Palak puri and palak puri chutney recipes

palak puri बनवण्यासाठी लागणारे साहित्य :  

पालक - ३ कप 
गव्हाचं पीठ - १ १/२ कप 
बेसन - १ कप 
गरम तेल - ३ चमचे 
अज्वान - १ चमचा 
जिरे पूड - १ चमचा 
तीळ - १ चमचा 
आले - १ छोटा तुकडा 
लसूण - ३-४ पाकळ्या 
लाल तिखट - १ १/२ चमचा 
मीठ - चवीनुसार 
तेल - तळण्यासाठी 
पाणी - १/२ कप (जर लागले तर )

palak puri बनवण्याची कृती :

palak puri बनवण्यासाठी , प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात आले-लसूण टाका आणि त्याचे टेस्ट तयार करून घ्या. एका भांड्यात २ ग्लास कोमट पाणी त्यात पालक १० मिनिटे भिजवून ठेवा. १० मिनिटं नंतर ती पालक पाण्यामधून काढून घ्या. 

एका मिक्सरचे भांडे घ्या. त्यात पालक टाका आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. नंतर एका भांड्यात ती पालकाची पेस्ट टाका. त्यामधे गव्हाचे पीठ, बेसन आणि गरम तेल टाकुन चांगले एकत्र करून घ्या.  

नंतर त्यात आले-लसणाची पेस्ट टाकून चांगले मिक्स करा. नंतर त्यात अज्वान, जिरे पूड , तीळ, लाला तिखट,मीठ टाकून चांगले मळून घ्या. शक्यतो सर्व पीठ तसेच भिजवून घ्या त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज लागणार नाही. palak puri चे पीठ थोडे घट्टच भिजवा.
 
तुम्हाला गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी टाकू शकतात. ते पीठ चांगले मळून घ्या आणि त्याचा गोळा तयार करून घ्या. तयार झालेल्या पीठ १५ मिनिटासाठी झाकुन ठेवा. 

१५ मिनिटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करा. नंतर त्या गोळ्यांचे पुऱ्यासारखे पुऱ्या लाटून घ्या. (त्या पुऱ्यांना जास्त नाही जास्त जाड नाही जास्त पातळ लाटा .)

सर्व पुऱ्या लाटल्यानंतर एका बाजूला कढई ठेवा. त्यात तेल टाका आणि तेल चांगले गरम करून घ्या. नंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवून. सर्व पुऱ्या टाळून घ्या. 

अश्या प्रकारे आपली palak puri तयार झाली. आता पालक पुरी तर झाली पण ती कश्यासोबत खायची ह्याचा प्रश्न असतो त्यासाठी palak puri chutney आहे ती खालील प्रमाणे:

palak puri chutney बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

दही : १/२ कप 
पाणी : ५ चमचे 
बारीक केलेली मिरची : १ चमचा 
शेंगदाण्याचे पूड  - ५ चमचे 
साखर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार

palak puri chutney बनवण्याची कृती :

एका भांड्यात दही टाका. त्यात पाणी मिक्सकरा आणि ते मिश्रण एकत्र करून घ्या. नंतर त्यात बारीक केलेली मिरची, साखर, मीठ,शेंगदाण्याचे पूड टाकून सर्व मिश्रण फेटा. जर palak puri chutney जास्त तिखट झाली असेल तर त्यात शेंगदाण्याचे पूड आणि दही टाकू शकतात. 

अश्या प्रकारे आपली palak puri सोबत  palak puri chutney तयार आहे. ही palak puri खायला खूप स्वादिष्ट आणि  पौष्टिक आहे. नक्कीच करून बघा, कशी वाटली ही  palak puri सोबत palak puri chutney नक्की सांगा.  

टीप : पालक पुरी करतांना तुम्ही पालक उकळून पण घेऊ शकतात.

Comments