tomato soup recipe | Indian recipes


सर्दीच्या दिवसात tomato soup एक आवडीचा पदार्थ मानतात . सर्दीच्या दिवसात हा गरम tomato soup पिण्याची मज्जाच वेगळी.हा tomato soup पोटासाठी अत्यंत हलका असतो. हा delicious tomato soup कसा बनवायचा हे बघूया.

tomato soup recipe | Indian recipes

tomato soup recipe | Indian recipes
tomato soup recipe | Indian recipes

tomato soup बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

टोमॅटो - ४-५ 
बारीक केलेले आलं - १ चमचा 
बारीक चिरलेला लसूण - २-३ पाकळ्या 
कडीपत्ता - ४-५ पाने 
बारीक चिरलेल्या मिरच्या  - ३ 
जिरे - १ चमचा 
मोहरी  - १ चमचा 
पाणी - गरजेनुसार 
तेल - २ चमचे 
कॉर्न फ्लोवर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
साखर - १ चमचा 

tomato soup बनवण्याची कृती:

tomato soup बनवण्यासाठी, एका भांड्यात टोमॅटो टाका ते भांडे कुकर मध्ये ठेवा. कुकर गॅसवर ठेऊन त्याला ३ शिट्ट्या घ्या आणि टोमॅटो चांगले शिजवून घ्या.

३ शिट्ट्या झाल्यावर शिजवलेले टोमॅटो सोलून घ्या.  नंतर एका वाटीत कॉर्न फ्लोवर आणि ४ चमचे पाणी घेऊन त्याला मिक्स करा.   

नंतर सोललेले टोमॅटो आणि कॉर्न फ्लोवरचे पाणी मिक्सर च्या भांड्यामध्ये टाका  टाकून बारीक करून घ्या. नंतर त्या मिश्रणाला चांगले गाळून घ्या.
 
नंतर एका कढईत २ चमचे तेल टाका. त्यात जिरे, मोहरी टाका. जिरे-मोहरी चांगली तडतड झाली, कि त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक केलेले आलं टाका आणि त्याला चांगले हलवून घ्या. 

नंतर त्यात कडीपत्ता,बारीक चिरलेल्या मिरच्या टाका आणि त्याला चांगले हलवून घ्या. लसूण थोडे लाल झाल्यावर त्यात टोमॅटोचे मिश्रण टाका. नंतर त्यात साखर, मीठ टाका.

मिश्रण टाकल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. हे tomato soup ४-५ मिनिटे शिजून द्या. ४-५ मिनिटानंतर टोमॅटो सूप ला उकळी येईल. उकळी आल्यावर गॅस बंद करा. हा tomato soup गरम गरम सर्व्ह करा. 

हा आपला tomato soup तयार झाला. 
 

Comments