समोसा सर्वानाच आवडतो. खुप लोक वेगवेगळ्या पद्धतीने समोसे बनवतात. अशीच एक Tasty samosa पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे.
Tasty samosa | Indian recipes
Tasty samosa बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
मैदा - १ कप
अज्वाईन - १ चमचा
मीठ - चवीनुसार
काळीमिरी पूड - १चमचा
बटाटा - ५-६
तेल - तळण्यासाठी
लाल तिखट - गरजेनुसार
Tasty samosa बनवण्याची कृती :
Tasty samosa बनवण्यासाठी प्रथम कुकर मध्ये ३ कप पाणी टाका आणि त्यात बटाटे टाका आणि त्याला ३-४ शिट्ट्या घ्या.
एका भांड्यात मैदा घ्या. त्यात २ चमचे गरम तेल, अज्वाईन आणि मीठ टाका आणि थोडे थोडे पाणी टाकून ते पीठ मळून घ्या. त्याला २० मिनिटे झाकून ठेवा.
बटाटे शिजल्यावर त्या बटाट्यांना कुचकरून घ्या. नंतर एका कढईत २ चमचे तेल टाका. त्यात काळीमिरीची पूड, चवीनुसार मीठ आणि १/२ चमचा लाल तिखट टाका. त्या मिश्रणाला चमच्याने चांगले हलवून घ्या.
मैद्याच्या पीठाला २० मिनिटे झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. नंतर त्याचा छोट्या चपात्या लाटून घ्या. नंतर त्याला मधून कापा आणि त्याचे त्रिकोणी आकार बनवून घ्या.
नंतर त्या त्रिकोणी आकारात तयार केलेले मिश्रण भरा आणि त्याला वरतून प्रेस करून घ्या. त्याचा सामोसा सारखा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व सामोसे तयार करून घ्या.
नंतर एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात तयार केलेले सामोसे टाकून लालसर टाळून घ्या.
हे तयार झालेले Tasty samosa सॉस सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात.
हे Tasty samosa नक्की करून बघा आणि आवडल्यास कंमेंट करून नक्की सांगा .
Comments
Post a Comment