Dal bati recipe | Indian recipes


Dal bati recipe | Indian recipes


Dal bati ही राजस्थानची सर्वात प्रसिद्ध रेसिपी आहे. एकदा ही  Dal bati खाल्ल्यानंतर नेहमी नेहमी करून खाण्याची इच्छा होईल. तर ही Dal bati recipe कशी करायची ते बघूया. 

Dal bati recipe | Indian recipes

Dal bati | Indian recipes
Dal bati | Indian recipes

Dal बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 

तूर डाळ - १ कप
तेल -  २ चमचे 
मोहरी - १/२ चमचा 
जिरे - १/२ चमचा 
कडीपत्ता - ४-५ पत्ते 
बारीक चिरलेला कांदा - १/२ कप 
बारीक चिरलेला टोमॅटो - १/२ कप 
भिजवलेली चिंच - १/४ कप 
गूळ - १/२ कप 
लाल तिखट - १ १/२ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
हळद - १/२ चमचा 
मीठ - चवीनुसार 

bati बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 

बट्टीचे पीठ (जाड गव्हाचे पीठ) - ३ कप 
अज्वान - १ चमचा 
गरम तेल - २ चमचे 
मीठ - चवीनुसार 
तेल - ३ चमचे  
तेल - तळण्यासाठी 

bati बनवण्याची  कृती :

bati बनवण्यासाठी -  प्रथम एक प्लेट घ्या. त्यात batti चे पीठ टाका, त्यात अज्वान, गरम तेल आणि चवीनुसार मीठ टाका. नंतर ते पीठ चांगले घट्ट मळून घ्या. १० मिनिटासाठी batti चे पीठ झाकून ठेवा. 

पहिली कृती - १० मिनीटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. नंतर एका गॅस वर कुकर ठेवा त्यात ३ चमचे तेल टाका. नंतर त्यात तयार केलेले बट्टी गोळे टाका. जितके त्यात तेलात बसेल तितकेच गोळे कूकर मध्ये टाका(छोट्या कुकर मध्ये ५-६ bati चे गोळे बसतात).

Bati in Cooker
Bati in Cooker 


कुकरची शिट्टी कडून ते झाकण कुकरला लावा. ३-४ मिनिटाने त्याला मध्ये मध्ये हलवा. त्यामुळे bati सर्व बाजूने भाजली जाईल. bati सर्व बाजूने भाजली गेल्यावर गॅस बंद करा. अश्या प्रकारे सर्व bati तयार करून घ्या. 

दुसरी कृती - १० मिनिटानंतर त्याचे मोठे गोळे तयार करून घ्या. नंतर इडलीच्या भांड्यात १ ग्लास पाणी टाका. त्यावर इडलीची एक प्लेट ठेवा. त्यावर तयार केलेले गोळे ठेवा आणि त्यावर १५ झाकून ठेवा. १५  मिनिटानंतर त्यात चाकू टाकून बघा. जर चाकूला ते चिटकले नसेल तर गॅस बंद करा. 

Frying bati
Frying bati


नंतर ते गोळे थंड झाले की त्याला हव्या त्या आकाराने कापून घ्या. एका बाजूला कढई मध्ये तळण्यासाठी तेल टाका. तेल चांगले गरम झाले की त्यात कापलेले bati टाका. तळताना गॅस मोठ्या आचेवरच ठेवा. त्या बट्ट्या चांगल्या लालसर तळून घ्या.  


Dal बनवण्याची कृती :

Dal बनवण्यासाठी, प्रथम डाळ कुकर मध्ये शिजत टाका. कूकरला ३-४ शिट्ट्या घ्या. नंतर गॅस बंद करा. एका बाजूला कढई ठेवा, त्यात तेल टाका. तेल गरम झाले की मोहरी, जिरे टाका. 

ते थोडे तडतड झाले की त्यात बारीक चिरलेले कांदा टाका. कांदा थोडा लालसर झाला की त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाका. टोमॅटो थोडा शिजला की त्यात काडीपत्ता टाका. 

एका बाजूला भिजलेल्या चिंचेचे पाणी काढून घ्या.नंतर ते चिंचेचे पाणी त्या मिश्रणात टाका. सोबतच लाल तिखट, गरम मसाला ,हळद  आणि चवीनुसार मीठ टाका. आणि चमच्याने चांगले हलवा. 

नंतर त्यात एक ग्लास पाणी टाका आणि सोबतच गूळ टाका. नंतर त्याला चांगले हलवून घ्या. (dal जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर तसे त्यात त्यानुसार पाणी टाकू शकतात.) dal चांगली उकळली कि गॅस बंद करा.     

एका प्लेट मध्ये तयार केलेले bati चुरून घ्या. नंतर त्यावर तयार केलेली dal टाका. आणि सर्वांना सर्व्ह करा.  ही dal bati असली तुपासोबत तर खूप छान लागते.

अश्या प्रकारे आपली राजस्थानी प्रसिद्ध dal bati रेसिपी तयार. ही रेसिपी नक्की करून बघा. खाण्यास पौष्टिक, स्वादिष्ट अशी ही dal bati रेसिपी खूप छान लागते. dal bati आवडल्यास नक्की सांगा.      


Comments