Tasty shingole recipe in marathi | Indian recipes - Indian cooking


शिंगोळे ही खरच चवदार आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी पौष्टिक सुद्धा आहे. Tasty Shingole Recipe महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणून ओळखली जाते. ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघुया. 

Tasty shingole recipe | Indian recipes - Indian cooking

Tasty shingole recipe
Indian recipes - Indian cooking
Tasty shingole recipe

Tasty Shingole Recipe बनवण्यासाठी लागणारे साहित्य:


ज्वारीचे पीठ  - १ कप 
गव्हाचे पीठ - १ कप
बेसन - १/२ कप 
अजवाइन / कॅरम बियाणे - १/4 चमचा
हळद - १/4 चमचा 
लसूण हिरवी मिरची पेस्ट (7- 8 लसूण पाकळ्या आणि 1-2 हिरव्या मिरच्या) - 1 टेस्पून 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - बारीक चिरलेली 
तेल - १ १/२ चमचा 
लसूण पेस्ट - १ १/२ चमचा 
गरम मसाला - १ १/२ चमचा 
लाल तिखट - १ १/२ चमचा 
पाणी  - ३ मोठे ग्लास
मोहरी
जिरे
हिंग

Tasty Shingole Recipe बनवण्याची कृती :

एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन घाला. ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. नंतर त्यामध्ये अजवाइन , हळद, लसूण मिरची पेस्ट आणि मीठ घाला. त्या मिश्रणाला एकत्र मिसळून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घाला आणि थोडेसे पाणी घालून मळून घ्या. पीठ खूप पातळ करू नका.ते थोडे जाड मळून घ्या.
ते भिजवलेले पीठ १० मिनिटासाठी झाकून ठेवा. 

नंतर एका बाजूला कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे घाला आणि तडतड  होऊ द्या.नंतर त्यात हिंग घाला आणि गॅस कमी आचेवर ठेवा.  नंतर त्यात लसूण पेस्ट, गरम मसाला आणि लाल तिखट घाला आणि त्याला चांगले मिक्स करून घ्या. १ मिनिटासाठी त्याला चमच्याने हलवा. नंतर त्यात पाणी आणि मीठ घाला आणि त्या ग्रेव्हीला छान उकळू द्या . 

Made shingole


पीठ भिजवून १० मिनिटे झाल्यावर त्या पिठाचे आपल्या आवडीनुसार जाड किंवा पातळ शिंगोळे बनवा. सर्व शिंगोळे तयार झाले कि त्या उकळत्या ग्रेव्ही मध्ये टाका. 

एकदा त्या शिंगोळ्यांना चमच्याने हलके मिक्स करा. नंतर त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर २० ते २५ मिनटे शिजत ठेवा.  शिंगोळे चांगले शिजल्यावर गॅस बंद करा. त्यावर कोथिंबीर घाला.  

हे शिंगोळे तुम्ही तसेच सुद्धा खाऊ शकता किंवा त्यावर थोडेसे लिंबू घालून सुद्धा खाऊ शकतात. जर Tasty shingole recipe मध्ये वरून तूप घेतलं तर त्याची मज्जाच वेगळी. 

ही चविष्ट, Tasty shingole recipe नक्की करून बघा आणि आवडल्यास कंमेंट करा.     

Comments