Khari recipe without oven


चहा सोबत लागणार पदार्थ म्हणजे खारी,बटर, टोस्ट. आजकाल दुकान बंद असल्यामुळे khari, butter  बाहेर लवकर मिळत नाही. खूप कमी साहित्यात घरच्या घरी ही कुरकुरीत khari without oven कशी बनवायची ते बघूया. 

Khari recipe without oven

Khari recipe without oven
Khari recipe without oven

Khari recipe without oven बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

मैदा - १ कप
डालडा तूप - ३ चमचे 
मीठ - चवीनुसार 
तेल - ३ चमचे 
लिंबूचा रस - १/२ चमचा 

khari बनवण्याची कृती :

khari बनवण्यासाठी , प्रथम एका प्लेटमध्ये तूप घ्या त्यात १ चमचा मैदा घाला. नंतर त्या तूप-मैद्याला हाताने चांगले फेटा. त्याची क्रीम सारखी पेस्ट तयार करून घ्या. नंतर ती पेस्ट एका वाटीत काढून घ्या.
 
नंतर एका प्लेट चाळणी ठेवा त्यामध्ये १ कप मैदा घ्या. त्यात मीठ टाका आणि तो मैदा चाळणीने चांगला चालून घ्या त्यामुळे मैदा थोडा हलका होईल. नंतर त्यात ३ चमचे तेल आणि लिंबूचा रस टाका आणि ते मिश्रण चांगल मळून घ्या. २ -३ मिनिटे ते मिश्रण मळून घ्या. 

Khari dough
Khari dough


नंतर त्या मिश्रणात थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण चांगले मळून घ्या. khari चे पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवा. हे पीठ नंतर त्या पीठाला चांगले मळून घ्या. त्या पीठाला जितक मळून मऊ करता येईल तितके करा. त्यामुळे तुमची khari कुरकुरीत होईल. 

पीठ चांगले मऊ झाल्यावर त्याचे छोटे छोटे ५-६ गोळे बनवून घ्या. नंतर त्या गोळ्यांना जितके पातळ लाटता येईल तितके पातळ लाटा आणि त्यांची गोल पोळी तयार करून घ्या. 

नंतर एका प्लेटमध्ये एक पोळी घ्या त्यावर आपण तयार करून ठेवलेले क्रीमी तूप पोळीच्या सर्व बाजूने लावा . नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवा. परत त्यावर क्रीमी तूप लावा अश्या प्रकारे एकावर एक टाकून सर्व पोळ्या तयार करून घ्या. नंतर त्या तयार झालेल्या पोळीचे चारी बाजूने घडी घालून चौकोनी आकार तयार करा. नंतर त्याला फ्रिज मध्ये १५ मिनिटासाठी ठेवा. 

१५ मिनिटानंतर त्या पिठला चौकोनीच लाटून घ्या. त्या पीठाला जास्त पातळ लाटू नका. नंतर त्याचे आवडीनुसार तुकडे करून घ्या (चौकोनी आकाराचे). नंतर एका प्लेट मध्ये ते सर्व khari चे तुकडे ठेवा आणि ती प्लेट फ्रिज मध्ये १० मिनिटासाठी ठेवा. 

एका बाजूला तावा गरम करण्यासाठी ठेवा. कमीत कमी तवा ७-८ मिनिटासाठी गरम करण्यासाठी ठेवा.

१० मिनिटानंतर तव्यावर बसेल अशी एक प्लेट ठेवाआणि त्यावर khari चे तुकडे ठेवा. त्यावर पॅक बंद असे झाकण ठेवा आणि गॅस कमी आचेवर ठेवा. (लक्षात ठेवा गॅस कमी आचेवरच पाहिजे त्यामुळे खारी पूर्ण पणे आतून भाजली जाईल. ) 

khari ला एका बाजूने लालसर बनायला २० मिनिटे लागतात. २० मिनिटे एका बाजूने चांगली  भाजून घ्यायची. नंतर दुसऱ्या बाजूने २० मिनिटे चांगली भाजून घ्यायची. 

अश्या प्रकारे सर्व khari तयार करून घ्या. मला माहित आहे khari बनायला वेळ लागतो पण एक नक्की सांगते वेळ जरी गेला तरी ही khari नक्की स्वादिष्ट बनते. 

एकदा नक्की करून बघा. ही स्वादिष्ट khari without oven तुम्हाला नक्की आवडेल. 

टीप : मैद्याच्या पीठात लिंबू जरी नाही घातला तरीसुद्धा khari चवदार बनते .
 

Comments