pavbhaji हा सर्वांचा आवडता पदार्थ. pavbhaji हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहान मुलांना तर pavbhaji बघताच तोंडाला पाणी सुटत. अशी ही झणझणीत चटपटीत मुंबईची pavbhaji कशी बनवायची ते बघूया.
Pavbhaji - maharashtrian recipe | indian recipes
pavbhaji बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बटाटा - 1/2 किलो
टमाटर - 1/2 किलो
फुलगोभी - १/४ किलो
शिमला मिरची - 2
बारीक चिरलेला कांदा - १ कप
भिजवून घेतलेले वटाणा - 1 कप
अमूल बटर - ३चमचे
तेल - ३चमचे
पावभाजी मसाला - ३चमचे
लाल तिखट - २ चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - १/२ चमचा
जिरे - १ चमचा
आले-लसणाची पेस्ट - २ चमचे
कोथिंबीर - १/२ कप
पाव - ३ ते ४ लादी
pavbhaji बनवण्याची कृती :
पावभाजी बनवण्यासाठी, प्रथम सर्व भाज्या चांगल्या धुवून घ्या. नंतर बटाटे सोलून घ्या. नंतर त्याला कापा. त्याच प्रमाणे टोमॅटो , फुलगोभी , शिमला मिरची कापून घ्या.
नंतर एक कुकर ह्या त्यात कापलेले टोमॅटो , फुलगोभी , शिमला आणि भिजवून घेतलेले वटाणे टाका आणि सोबतच ३ ग्लास पाणी टाकून ३-४ शिट्टया घ्या.
नंतर भाज्या चांगल्या शिजल्यावर एका भांड्यात काढून घ्या. नंतर त्या शिजलेल्या भाज्यांना चांगले बारीक करून घ्या.
एका बाजूला गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल टाका. नंतर त्यात बटर टाका . नंतर त्यात जिरे टाका. जिरे थोडे तडतड झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा थोडा लालसर मऊ झाल्यावर त्यात आले-लसणाची पेस्ट टाका. नंतर त्याला चांगले हलवा.
नंतर त्यात pavbhaji मसाला टाका आणि पुन्हा हलवा . नंतर त्यात लालतिखट,हळद आणि मीठ टाकून त्याला चांगले हलवा. नंतर त्यात बारीक केलेल्या सर्व भाज्या टाका. नंतर सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
नंतर त्यात १/२ ते १ ग्लास पाणी टाकून चांगले हलवून घ्या.(तुम्हाला हवी तशी पाणी टाकून पातळ घट्ट करू शकतात.) नंतर ५ ते ७ मिनिटासाठी त्याला झाकून ठेवा आणि मध्यम आचेवर ठेवा.
एका बाजूला गॅसवर तवा ठेवा. त्यावर बटर किंवा तूप(असली तूप) टाका आणि पाव चांगले गरम करून घ्या.
५-७ मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर वरून एक चमचा बटर,कोथिंबीर टाका आणि चांगले हलवून घ्या. सर्वांना गरम गरम pavbhaji सर्व्ह करा. pavbhaji सर्व्ह करतांना सोबत थोडा कांदा, आणि लिंबू द्या. त्याने pavbhaji ची टेस्ट खूपच छान येते.
एकदा ही झणझणीत pavbhaji नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की कंमेंट करा.
Comments
Post a Comment