Dum Aloo ही उत्तर भारतामधली खूप प्रसिद्ध रेसिपी आहे. तुम्ही खूप प्रकारचे Dum Aloo Recipe बघितले असेल. मी आज तुम्हाला एका पद्धतीची Dum Aloo Recipe सांगणार आहे.
Dum Aloo Recipe | Indian Recipes
Dum Aloo बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
लहान बटाटे - 15-20
बारीक चिरलेला कांदा - 3-4
बारीक चिरलेला टोमॅटो - 3-4
हिरवी मिर्च - २
आले - 1 तुकडा
लसूण - 8-10 पाकळ्या
तेल - तळण्यासाठी
धने पूड - 2 चमचा
लाल तिखट - १/२ चमचा
काश्मिरी मिर्च पावडर - 1 चमचा
मीठ - चवीनुसार
हळदी - चिमूटभर
गरम मसाला - 2 चमचा
जीरा - १/२ टीस्पून
इलायची - २
लवंगा - 2
काळीमिरी - ४-५
दही - 1 कप
मलाई - २ चमचे
साखर 1 टीस्पून (पर्यायी)
Dum Aloo Recipe बनवण्याची कृती :
Dum Aloo Recipe बनवण्यासाठी, प्रथम सर्व बटाटे सोलून घ्या. नंतर त्याला काट्याच्या चमच्याचे छोटे छोटे भोक पडून घ्या. जेणे करून दम आलूची ग्रेव्ही त्यात जाईल.
नंतर एका कढई मध्ये तेल घ्या. त्यात बटाटे टाका. त्यावर चिमूटभर मीठ टाका आणि सर्व बटाटे लालसर तळून घ्या.
नंतर एका कढईत २ चमचे तेल टाका, त्यात जीरा, इलायची , लवंगा, काळीमिरी टाका. खडा मसाला थोडा तडतड झाला की त्यात कांदा टाका . कांदा लालसर झाला की त्यात लसूण, अदरक आणि हिरवी मिरची टाकून चांगल हलवून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो टाका. त्याला चांगल हलवून घ्या . जेव्हा हा मसाला तेल सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल की ते मिक्सर मधून बारीक करा.
एका वाटीत दही घ्या आणि त्यात ३ चमचे मलाई टाका. त्याला चांगले फेटून घ्या. नंतर त्यात धने पूड,लालतिखट,काश्मिरी मिर्च पावडर,हळद आणि गरम मसाला टाकून चांगले फेटून घ्या.
नंतर एक कढई घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा. त्यात २ मोठे चमचे तेल टाका. नंतर त्यात एक तेजपत्ता आणि सोबतच कांदा टोमॅटोचा जो मसाला तयार करून घेतला होता तो त्यात टाका. त्या मसाल्याला २ मिनिटे चांगल हलवून घ्या.
गॅस कमी आचेवरच ठेवा. त्यावेळेस त्यात दही मसाल्याचे मिश्रण टाका. दही मसाल्याचे मिश्रण टाकल्यावर गॅस मोठ्या आचेवर करा आणि लागातार त्या मिश्रणाला हालवा जो पर्यंत त्या मिश्रणाला उकळी येत नाही तो पर्यंत.
एक उकळी आल्यावर गॅस कमी आचेवर करा आणि त्यात थोडे पाणी टाकून २-३ मिनिटे झाकून ठेवा. २-३ मिनिटानंतर ते मिश्रण थोडे मिक्स करून घ्या. नंतर त्या ग्रेव्हीत तळलेले बटाटे आणि सोबतच मीठ टाका. त्याला चांगल मिक्स करून घ्या. गरजेनुसार तुम्ही त्यात पाणी टाकू शकतात. जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तसे तुम्ही त्यात पाणी टाकू शकतात. पाणी टाकून ३-४ मिनिटासाठी त्यावर झाकून ठेवा.
३-४ मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर त्यावर कोथिंबीर टाका आणि झाकून ठेवा. जेव्हा सर्व्ह करायचे असेल तेव्हा Dum Aloo हालवून सर्व्ह करा.
हि Dum Aloo Recipe एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बाकीच्या Dum Aloo Recipe तुम्ही विसरून जाईल.
टीप : जर घरात मलाई नसेल तरी दह्यामध्ये सर्व मसाले टाकून त्याचे मिश्रण ग्रेव्हीत टाकले तरी स्वाद छान येईल.
सर्व्ह करण्याच्या १ तास आधी Dum Aloo तयार करा. जेणे करून सर्व मसाल्यांचा स्वाद त्या आलू मध्ये जाईल.
Comments
Post a Comment