How to make delicious Dabeli | Dabeli recipes


दाबेली हा प्रकार खूप जणांना आवडता पदार्थ आहे . Dabeli हे स्वादिष्ट आणि प्रसिद्ध भारतीय स्ट्रीट फूड आहे. हि Delicious Dabeli कशी बनवायची हे आपण बघूया. 

How to make delicious Dabeli | Dabeli recipes

how to make delicious dabeli
Delicious dabeli

Delicious Dabeli बनवण्याचे साहित्य :

बटाटा - ६-७
दाबेली मसाला - ४ चमचे
तेल - ४ मोठे चमचे
टोमॅटो - १
बारीक चिरलेला कांदा - २
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ कप
खारे शेंगदाणे - १ कप
डाळिंब - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
चिंचगूळाची चटणी
हिरवी चटणी
बटर/तूप - दाबेली भाजण्यासाठी
पाव - २ लादी

Delicious Dabeli बनवण्याची कृती :

प्रथम सर्व बटाटे कुकर मध्ये टाका त्यात थोडे पाणी टाकून ४-५ शिट्ट्या घ्या.  बटाटे शिजल्यावर त्याला बारीक करून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो टाका आणि बारीक करून घ्या. 

नंतर एका कढईत तेल टाका. त्यात दाबेली मसाला टाका २० सेकेंड त्याला हालवा नंतर त्यात बारीक केलेले टोमॅटो टाका आणि थोडे हलवून घ्या. नंतर त्यात मीठ आणि  बारीक केलेले बटाटे टाका. त्याला चांगले हालवा, नंतर त्यात १/२ कप पाणी टाका आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. सर्व मिश्रण मिक्स केल्यावर ५ मिनिटाने गॅस बंद करा.

stuffing dabeli


नंतर पावाचे मधून भाग करा. त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी चटणी आणि चिंचगूळाची चटणी लावा. नंतर त्यावर बटाट्याचे मिश्रण लावा. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, खारे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे भुरभुरा. अश्याप्रकारे सर्व सारण सर्व पावांमध्ये भरून घ्या.नंतर गॅसवर ताव ठेवा. त्यावर बटर किंवा तूप टाका आणि सर्व कच्ची दाबेली भाजून घ्या. 

delicious dabeli


नंतर त्यावर शेव टाकून सर्वांना सर्व्ह करा. हि Delicious Dabeli नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हि Delicious Dabeli आवडल्यास कंमेंट करून सांगा.

टीप : हि Delicious Dabeli तुम्ही कच्ची सुद्धा खाऊ शकतात. 

How to make ragda kachori
How to make halwai style balushahi
Homemade Coconut Laddu | ready in 15 minutes

Comments