उत्तर भारतातील बालुशाही हि सर्वात प्रसिद्ध गोड पदार्थ आहे. सहसा लोकांना बालुशाही घरी बनवायला जमत नाही. त्यासाठी मी घरगुती सामान पासून halwai style balushahi बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहे.
Halwai Style Balushahi बनवण्याचे साहित्य :
मैदा : १ कप
साखर : १ कप
दही : १/२ कप
इलायची : २
मीठ : चिमूटभर
तेल : तळण्यासाठी
खाण्याचा सोडा : १/२ चमचा
फूड कलर : गरजेनुसार
पाणी : १ १/२ कप
Halwai Style Balushahi बनवण्याची कृती :
प्रथम एका भांड्यात मैदा घ्या. त्या मैद्यात मीठ,खाण्याचा सोडा, २ चमचे गरम केलेले तेल टाकून चांगले मिक्स करून घ्या.
नंतर त्या मिश्रणात दही टाकून सर्व मिश्रण भिजवून घ्या. त्या मिश्रणाचे मऊ पीठ बनवून घ्या. त्या पिठाला १५ मिनीट झाकून ठेवा.
नंतर एका बाजूला साखरेचा पाक बनवण्यासाठी गॅस वर एक भांडे ठेवा. त्यात एक कप साखर टाका सोबतच १ १/२ कप पाणी आणि इलायची बारीक करून टाका. त्या पाकला चमच्याने हालवा. त्या मिश्राचा एक तरी पाक बनवून घ्या आणि गॅस बंद करून त्यात फुड कलर टाका आणि पाक हालवून घ्या.
१५ मिनिटानंतर मैदाच्या मिश्रणाचे छोटे छोटे मधल्या भागी होल असलेले गोळे तयार करून घ्या. एका बाजूला गॅस कमी आचेवर ठेवा आणि गॅस वर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका. तेल थोडेच तापवा आणि तयार केलेले गोळे त्यात टाका. त्या गोळ्यांना कमी आचेवर तळा. त्या गोळ्यांना लालसर कलर आल्यावर काढून घ्या. नंतर तयार केलेल्या पाकात ते तळलेले गोळे सोडा.
२-३ मिनिट त्या पाकात ते गोळे भिजत ठेवा नंतर ती स्वादिष्ट, halwai style balushahi काढून सर्वांना खाण्यासाठी द्या.
अश्या प्रकारे घरच्याघरी halwai style balushahi तयार.ही बालुशाही कशी वाटली नक्की सांगा आणि एकदा करून बघा.
Comments
Post a Comment