Dal pakwan ही एक प्रसिद्ध सिंधी रेसिपी आहे. खाण्यामध्ये चविष्ट कुरकुरीत अशी ही Dal pakwan recipe आहे. हि टेस्टी Dal pakwan recipe कशी करायची हे बघूया.
Dal pakwan recipe | Indian recipes
Dal pakwan recipe | indian recipes |
Dal pakwan recipe बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
मैदा - १ कप
चणा डाळ - १ १/२ कप
तेल - ४ चमचे
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
जिरे पूड -१/२ चमचा
बारीक चिरलेला टोमॅटो - १
बारीक चिरलेला कांदा - १
बारीक चिरलेली कोथिंबीर - गरजेनुसार
मीठ - चवीनुसार
चिंचगूळाची चटणी
हिरवी चटणी
दही -१ कप
शेव -१ कप
पाणी - २ कप
Dal pakwan recipe बनवण्याची कृती :
Dal pakwan recipe बनवण्यासाठी प्रथम चणा डाळ २ तास भिजत घाला. २ तासानंतर एका कुकर मध्ये ती भिजलेली चणा डाळ आणि पाणी टाका. त्याला २ शिट्ट्या घ्या नंतर गॅस बंद करा.
एका बाजूला पकवान बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा घ्या. त्यात २ चमचे गरम तेल आणि चवीनुसार मीठ टाका. त्या मिश्रणाला चांगले भिजवून घ्या. ते पीठ भिजवून झाल्यानंतर त्याला १५ मिनटे झाकून ठेवा.
नंतर एका कढईत २ चमचे तेल टाका. त्यात शिजलेली चणा डाळ टाका. नंतर त्यात लाल तिखट, जिरे पूड, चवीनुसार मीठ टाका आणि त्याला चांगले हलवून घ्या. २ मिनिटानंतर गॅस बंद करा.
पकवण्याच्या पीठाला १५ मिनिटे झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. नंतर त्याला छोट्या चपातीसारखे पातळ लाटून घ्या(३-४ cm इतके). नंतर त्या लाटलेल्या पक्वनाला तेलामध्ये तळून घ्या. हे पकवान कुरकुरीत बनेल.
नंतर एका प्लेट मध्ये पकवान ठेवा. त्यावर आपण तयार केलेली डाळ टाका. नंतर त्यावर दही, चिंचगूळाची चटणी, हिरवी चटणी टाका. नंतर त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव टाका. अश्या प्रकारे सर्व Dal pakwan तयार करून सर्वांना सर्व्ह करा. खाण्यास चविष्ठ, कुरकुरीत असा हा डाळ पकवान तयार.
ही Dal pakwan recipe नक्की करून बघा. घरगुती सामनापासून बनवलेलं Dal pakwan तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.
टीप : तुम्ही मैद्याच्या पिठात अज्वान सुद्धा टाकू शकतात.
Comments
Post a Comment