Ragda Pattice Recipes | Indian recipes


ragda pattice सर्वांनाच आवडतो . चाट मध्ये प्रसिद्ध डिश म्हणजे ragda pattice. ही ragda pattice recipe कशी बनवायची ते बघूया.  

Ragda Pattice Recipes | Indian recipes

Ragda Pattice Recipes | Indian recipes
Ragda Pattice Recipes | Indian recipes

Ragda बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भिजवलेले वाटाणा  - २ १/२ कप 
जिरे - १ चमचा 
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार 
पाणी - ३ ग्लास 
तेल - २ चमचे 

pattice बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

बटाटे - ६-७
कॉर्न फ्लोवर - १/२ कप 
ब्रेड - ६ स्लाइस 
मीठ - चवीनुसार 

ragda  pattice बनवण्यासाठी इतर साहित्य :

चिंचगुळाची चटणी 
हिरवी तिखट चटणी 
बारीक चिरलेला कांदा 
बारीक चिरलेला टोमॅटो 
दही 
बारीक शेव
कोथिंबीर 

ragda pattice recipe बनवण्याची कृती :

ragda pattice बनवण्यासाठी, प्रथम एका कुकर मध्ये भिजलेले वाटाणे आणि बटाटे टाका. त्यात वाटाणे भिजेल इतके पाणी टाका. नंतर त्यावर झाकण लावून ३-४ शिट्ट्या घ्या.

वाटाणे आणि बटाटे शिजल्यानंतर बटाटे एका प्लेट मध्ये काढून घ्या, त्या बटाट्याला सोलून घ्या. नंतर सोललेल्या बटाट्यांना बारीक करून घ्या. नंतर एका भांड्यात १/२ कप पाणी घ्या त्यात ब्रेड बुडवून काढा. 

नंतर तो ब्रेड बारीक केलेल्या बटाट्यात टाका सोबतच कॉर्न फ्लोवर आणि चवीनुसार मीठ टाका. आणि ते मिश्रण सर्व चांगले एकत्र करून घ्या. खालील दिल्या प्रमाणे pattice तयार होईल असा त्याचा गोळा बनवून घ्या.नंतर त्याचे छोटे छोटे pattice तयार करून घ्या. 

Pattice on tawa
Pattice on tawa


एका बाजूला तवा गॅस वर ठेवा. त्यावर थोडे तेल टाका आणि तयार केलेले pattice चांगले लालसर भाजून घ्या. अश्या प्रकारे pattice तयार.  

Pattice
Pattice


एका बाजूला कढईत २ चमचे तेल टाका.  त्यात जिरे टाका. जिरे थोडे तडतड झाले कि त्यात थोडी हळद टाका आणि शिजलेले वाटाणे टाका.  त्याला चांगले हलवून घ्या. नंतर त्यात पाणी टाका (जर रगडा थोडा पातळ पाहीजे असेल तर अजून पाणी टाका. ). ४-५  मिनिटे त्या रगड्याला चांगले शिजून द्या. रगड्याला उकळी आली की गॅस बंद करा.अश्या प्रकारे रगडा तयार.  

Ragda
Ragda


नंतर एक प्लेट घ्या. त्यावर  तयार झालेले pattice टाका. त्यावर ragada टाका. नंतर त्यावर  चिंचगुळाची चटणी, हिरवी तिखट चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, दही, बारीक शेव आणि कोथिंबीर भुरभुरा आणि सर्वांना सर्व्ह करा. 

अश्या प्रकारे ragda pattice recipe तयार . नक्की करून बघा आणि आवडल्यास कंमेंट करून नक्की सांगा. 

Comments