Ragda kachori | Indian recipes


कधी कधी काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते, घरात सर्व साहित्य पण असत पण समजत नाही काय करायचं. त्यासाठी हि स्वादिष्ट चटपटीत Ragda kachori मी आज सांगणार आहे.   

Ragda kachori | Indian recipes

Ragda kachori | Indian recipes
Ragda kachori | Indian recipes

Ragda kachori सारणासाठी साहित्य :
धणे - २ छोटे चमचे  
जिरे - २ छोटे चमचे 
बडीशेप - २ छोटे चमचे  
तेल - २ चमचे 
बेसन - १/२ कप 
हळद - हळद १/२ चमचा 
लाल तिखट - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
साखर - १ चमचा 

Ragda kachori रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
भिजवलेले वाटाणा  - २ १/२ कप 
बटाटा  - १
मोहरी - १ चमचा 
जिरे - १ चमचा 
बारीक चिरलेला कांदा - १/२ कप 
लाल तिखट - १ १/२ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार 
पाणी - ३ ग्लास 

कचोरीचे कव्हर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
मैदा - १ कप 
गरम केलेले तेल - एक चमचा 
मीठ - चवीनुसार

इतर साहित्य :
तेल - तळण्यासाठी
चिंचगुळाची चटणी 
हिरवी तिखट चटणी 
दही 
बारीक शेव
कोथिंबीर 

सारण बनवण्याची कृती :
धणे, जिरे, बडीशेप मिक्सर मध्ये काढून घ्या. नंतर एका कढईत तेल थोडे गरम करून घ्या. नंतर त्यात मिक्सर मधून काढलेली पूड,साखर आणि बेसन टाका. त्या मिश्रणाला चमच्याने एकत्र करून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्या मध्ये हळद चटणी मीठ घाला आणि मिश्रण चमच्याने हालवा. बेसन चांगले भाजले गेले की गॅस बंद करा. 

रगडा बनवण्याची कृती :
कुकर मध्ये थोडे पाणी घाला त्यात वाटाणे  आणि बटाटा टाका आणि  ४-५ शिट्या घ्या.
नंतर एका कढईत तेल टाका. नंतर त्यात जिरे आणि मोहरी टाका. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि त्याला चमच्याने हालवा. कांदा थोडा लाल झाला की त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि हळद टाकून त्याला हालवा. नंतर त्यात वाटाणे आणि बटाटा बारीक करून टाका. नंतर त्यात पाणी आणि मीठ टाकून हलवा. त्याला चांगली उकळी येऊन द्या आणि गॅस बंद करा. 

कचोरी बनवण्याची कृती :
एका भांड्यात मैदा घ्या त्यात तेल आणि मीठ टाका आणि त्या मिश्रणाला चांगले मळून घ्या. ते पीठ चपाती सारखे मळून घ्या आणि १५ मिनिटासाठी झाकून ठेवा. 
१५ मिनिटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करा आणि त्याची छोटी चपाती बनवून घ्या. नंतर त्यात ते बेसनाचे मिश्रण भरा आणि लाटून घ्या. 
एका बाजूला कढई मध्ये तेल टाका आणि तेल तापून घ्या. नंतर गॅस कमी आचेवर ठेवा आणि सर्व तयार केलेल्या कचोऱ्या तळून घ्या.  
  
kachori | Indian recipes
kachori | Indian recipes


नंतर एक प्लेट मध्ये कचोरी काढून वरच्या बाजूला लहानसे भोक पाडावे. आत चिंचेची चटणी, हिरवी चटणी घालावी. त्यावर दही लाल तिखट, शेव आणि कोथिंबीर आवडीनुसार भुरभुरावे. त्यावर रगडा टाकून लगेच सर्वांना Ragda kachori सर्व्ह करावे.    

अश्या प्रकारे आपली delicious Ragda kachori तयार, हि कचोरी नक्की करून बघा आणि आवडल्यास कंमेंट करून नक्की कळवा. 

टीप: जर घरात अजिनोमोटो असेल तर रगाड्यात ते तुम्ही टाकू शकतात. 
      तुम्हाला रगड्यावर तरंग हवी असेल तर एका कढईत तेल गरम करून तयार थोडी लाल तिखट टाका आणि ती रगाड्यावर  टाका. त्याने रगडायला तरंग येईल. 

Comments