Manchow soup recipes | Indian recipes


manchow soup ही chinese लोकांची प्रसिद्ध रेसिपी आहे. आपल्या भारतीय लोकांना सुद्धा manchow soup खूप आवडतात. लहान मुलांचा आवडता सूप म्हणजे manchow soup. हा manchow soup कसा करायचा ते बघूया.  

Manchow soup recipes | Indian recipes  

Manchow soup recipes | Indian recipes
Manchow soup recipes | Indian recipes

veg manchow soup बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पाणी - 1 लिटर
भाज्या  - किमान  कप (थोडी बारीक केलेली पत्तागोबी, गाजर,कांद्याची पात  )
हक्का नूडल्स - 100 ग्रॅम उकडलेले
कॉर्न फ्लोअर - २ टेस्पून
तेल - 1 टेस्पून
बारीक केलेले आले - 1 इंच
बारीक केलेले लसूण - 2 चमचे
बारीक केलेले हिरवी मिरची - २
बारीक चिरलेला कांदा - 1 लहान
बारीक चिरलेला गाजर - ½ लहान
बारीक चिरलेला कोबी - ¼ कप
मीठ - चवीनुसार 
मिरपूड - चवीनुसार 
धणे पूड  - 3 टेस्पून
सोया सॉस - 1 टेस्पून
लाल मिरची सॉस - 1 टीस्पून
व्हिनेगर - ½ टीस्पून
कॉर्न फ्लोअर - 2 टेस्पून

veg manchow soup बनवण्याची कृती:

veg manchow soup बनवण्यासाठी, प्रथम एका कढईत १ लिटर पाणी टाका, त्यात बारीक केलेल्या भाज्या टाका. नंतर त्यावर झाकण ठेवून २० मिनिटे उकळून घ्या जेणे करून भाज्यांचा सर्व स्वाद त्या पाण्यामध्ये येईल. 

२० मिनिटे त्या भाज्या उकळल्यावर जवळपास ते पाणी निम्म होईल आणि त्याचा कलर पण थोडा पिवळा होईल. २० मिनिटांनंतर त्या भाज्यांना चाळणीने गाळून घ्या. त्यातील भाज्या आणि पाणी वेगवेगळे करा. जे भाज्यामधून पाणी निघाले त्या पाण्याला आपण manchow soup चा स्टॉक बोलू शकतो. 

आता आपण manchow soup बनवतोय तर त्यासाठी chow तर लागेल, chow म्हणजे नूडल्स ते कसे करायचे ते बघूया. 

एका भांड्यात उकळले हक्का नूडल्स  त्यात  २ चमचे कॉर्न फ्लोअर टाका आणि त्याला चांगले मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा त्या नूडल्स मध्ये जास्त कॉर्न फ्लोअर टाकू नका. त्यामुळे तळण्याचे तेल खराब होईल. 

नंतर एका कढईत टाळण्यासाठी तेल गरम करून घ्या. गरम झालेल्या तेलात कॉर्न फ्लोअर मिक्स केलेले नूडल्स टाका आणि त्याला चांगले तळून घ्या. हे तळलेले नूडल्स कुरकुरीत होईल. 

Manchow
Manchow


नंतर manchow soup मधला सूप बनवण्यासाठी एक कढई घ्या, त्यात १ चमचा तेल टाका . नंतर त्यात आले, लसूण, आणि मिरची टाकून त्याला ३० सेकंद मोठ्या आचेवर हलवून घ्या. ३० सेकंदानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर,बारीक चिरलेला कोबी टाका आणि मोठ्या आचेवरच त्याला हलवून घ्या. 

ते मिश्रण जर कढईला लागत असेल तर त्यात तयार केलेला स्टॉकचे पाणी टाका(तुम्ही साधे पाणी सुद्धा टाकू शकतात). स्टॉकचे पाणी टाकल्यावर अजून ३० सेकंद त्याला हालवा. 

३० सेकंदानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. सोबतच काळीमिरीची पूड, सोया सॉस,लाल मिरची सॉस आणि थोडी कांद्याची पात(तुम्हाला हवी असल्यास तुम्ही त्यात मश्रूम, शिमला मिर्च टाकू शकतात. ) टाकून १ मिनिट पर्यंत त्याला चांगलं हलवून घ्या. 

१ मिनिटानंतर  त्यामध्ये उरलेला सर्व स्टॉक टाकून द्या आणि त्याला चांगलं मिक्स करा. त्यामध्ये अजून १/२ ग्लास पाणी टाका. तुम्हाला सूप पातळ पाहिजे असेल तर त्यात तुम्ही अजून पाणी टाकू शकतात.   

एका बाजूला एका वाटीत २ चमचे कॉर्न फ्लोअर आणि ५ चमचे पाणी टाकून मिक्स करा. सूपला उकळी आली की त्यात हे कॉर्न फ्लोअरचे मिश्रण टाकून हलवा. त्यामुळे तो थोडा घट्ट होईल आणि चवीमध्ये पण फरक जाणवेल.(लक्षात ठेवा कॉर्न फ्लोअर टाकतांना एका हाताने सूपला हलवा जेणेकरून त्यात lums पडणार नाही. ) कॉर्न फ्लोअर टाकल्यावर एक उकळी घ्या. नंतर त्यात व्हिनेगर टाका आणि २ मिनिट पर्यंत त्याला उकळून द्या. २ मिनिटानंतर गॅस बंद करून गरम गरम सूप तळलेल्या नूडल्स सोबत सर्व्ह करा. 

असा हा आपला manchow soup रेडी. हा manchow soup आवडला असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.  

टीप : ह्या manchow soup मध्ये आपण थोडा अजिनोमोटो सुद्धा घालू शकतो.   

Comments