आपण घरात वेगवेळ्या प्रकारचे पकोडे बनवतो पण त्यासोबत काहीतरी चटपटीत खाण्यासाठी लागते. अशीच एक झटपट , सोपी आणि लवकर होणारी pakoda chutney मी सांगणार आहे.
pakoda chutney recipes | indian recipes
pakoda chutney बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
लसुण - 12 ते 13 पाकऴया
आले - 1 मोठा तुूकडा
हिरवी मिरची - 10 ते 12
काॅर्नफाॅवर - 1/2 कप
पाणी - 3 ग्लास
फुड कलर - 2 चमचे
तेल - 2 चमचे
व्हिनेगर - 1 चमचा
सोया साॅस - 1 चमचा
मीठ - चवीनुसार
pakoda chutney बनवण्याची कृती :
पकोडयाची चटणी बनवण्यासाठी प्रथम एका मिक्सरच्या भांड़यात आल,लसुन आणि मिरच्या चांगल्या बारिक करून घ्या.
नंतर एका गॅसवर कढई ठेवा. त्यात 2 चमचे तेल टाका. नंतर त्यात आल,लसुण आणि मिरचीची जी पेस्ट केली ती टाका आणि चांगले हलवा.
त्या पेस्टवर थोडे बाजुने तेल दिसले. कढईला ती पेस्ट थोडी चिटकायला लागली की त्यात व्हिनेगर, फुड कलर, सोया साॅस आणि मीठ टाकुन त्या मिश्रणाला चांगले हलवा.
एका बाजूला एका भांड़यात काॅर्नफाॅवर घ्या. त्यात एक ग्लास पाणी टाका आणि त्याला चांगले हलवा. त्याचे गोळे होणार नाही याची काळजी घ्या. हे काॅनफाॅवरचे मिश्रण कढईत टाका आणि सतत हलवा.
त्यामुळे त्या मध्ये गोळे होणार नाही नंतर ते मिश्रण हळूहळू घट़ट होण्यास सुरूवात होईल. त्या मिश्रणामध्ये हवे असल्यास पाणी घाला आणि त्याला सतत हलवा. नंतर त्याला हळूहळू उकळी येण्यास सुरूवात होईल. त्यावेळी गॅस बंद करा.
ही pakoda chutney 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते. जर चटणी जास्त घट़ट झाली असेल तर त्यात पाणी टाका. अशा प्रकारे चविष्ट , झणझणीत pakoda chutney तयार. ही pakoda chutney तुम्ही पत्ता गोभी पकोडा सोबत खाऊ शकतात. नक्की घरी करुन बघा आणि आवडल्यास कमेंट करुन सांगा
Comments
Post a Comment